नवी दिल्ली : भारताची युवा नेमबाजपटू शांभवी हिने जागतिक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यावेळी तिने १०.८ असा अचुक निशाणा लावला. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात हे पदक मिळवून दिले.याआधी तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तसेच तिने ऑलिंपिक स्पर्धेतदेखील अंतिम फेरी गाठली होती. अवघ्या १६ वर्षांची असणारी शांभवी हिने लिमा येथे झालेल्या पाचव्या ज्युनियर जागतिक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. तर तिचा पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत अव्वल क्रमांकावर होती.
Fans
Followers